संपादक - लेख सूची

संपादकीय

आजचा सुधारक चा हा नवा अंक आपल्यासमोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याची संधी मी घेत आहे. मराठीत नियतकालिकांची कमतरता नाही. त्यांपैकी वैचारिक नियतकालिकांची स्थिती मात्र गेल्या अनेक वर्षांपासून चिंताजनक म्हणावी अशी आहे व ती दिवसेंदिवस ढासळताना दिसते आहे. मुळात मराठी भाषेतील व्यवहारालाच ओहोटी लागली आहे. वैयक्तिक संवादापासून गहन …

पुस्तक परिचय

काबाचा पवित्र काळा पाषाण मुळात अल्-उझ्झा या अरबस्तानच्या आद्य मातृदेवतेचे प्रतीक होता —- ‘अरबस्तानची महादेवी सर्वसामान्यपणे अल्-उझ्झा या नावाने संबोधली जाई. अल्-किंदी आपल्याला सांगतो की, अल्-उझ्झा म्हणजे चंद्र. तिचे मुख्य मंदिर, आठा अरबस्तानचे सर्वांत प्रसिद्ध व पवित्र स्थान, मक्केचे काबा हे होते. या पवित्र स्थानाचे वतनदार असलेला कुरेश गण (कबीला) इस्लामपूर्व काळात तिचा पुरोहितवर्ण होता …

वर्गलढा आणि स्त्री-पुरुष लढा ह्यांतील साम्यभेद

[द सेकंड सेक्स ह्या स्त्रीवादावरील अग्रगण्य पुस्तकाची लेखिका सिमाँ दि बोवा आणि प्रसिद्ध तत्त्वचिंतक, लेखक जाँ पॉल सार्च ह्यांनी विसाव्या शतकात केलेला सहजीवनाचा प्रयोग अनेक अर्थांनी नावीन्यपूर्ण व वादळी ठरला होता. पुरुषाने वर्चस्व गाजवायचे आणि स्त्रीने त्याच्या छायेप्रमाणे राहायचे ह्या जागतिक गृहीतकाला छेद देत ही दोन स्वतंत्र विचाराची व्यक्तिमत्त्वे विवाह न करता जन्मभर एकत्र राहिली. …

पत्रसंवाद

राजीव जोशी, dr.rajivjoshi@yahoo.com आसु जुलै २०१३ मधील तारक काटे यांचा लेख वाचला. आज जगभरात… २,८६,००० प्रजाती सपुष्प वनस्पतींच्या आहेत…. नवी प्रजाती (species) किंवा वाण तयार होतो…. जगात आज गव्हाच्या १४००० वाणांची नोंद झाली आहे. भारतात तांदळाचे जवळपास दोन लाख वाण अस्तित्वात असावेत. असे ते पहिल्या-दुसऱ्या परिच्छेदात लिहितात. २,८६,००० प्रजातींपैकी भारतातील २,००,००० तांदळाचे आणि जगातील १४००० …

टिप्पणीविना: स्वच्छतेची झळी

गेल्या दोन वर्षांपासून पुणे येथील कचरावेचक संघटना सॅनिटरी पॅड तयार करणाऱ्या कंपन्यांचे लक्ष वेधू पाहात आहेत. ह्या संघटना सॅनिटरी पॅडही उचलतात, परंतु त्यांनी शेवटपर्यंत ह्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यामुळे स्वच्छ पुणे सहकारी संस्था मर्यादित ह्या संस्थेला एक आगळे पाऊल उचलावे लागले. ह्या कामातील प्रॉक्टर गॅबल्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, जॉन्सन जॉन्सन आणि किंबले क्लार्क लिव्हर ह्या चारही …

पत्रसंवाद

श्याम कुलकर्णी, sgk664@gmail.com वाढता हिंसाचार व स्त्रीपुरुषसंख्येतील असमतोल श्री. रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या लेखातील विचार एकांगी वाटतात. प्रत्यक्षात बलात्काराच्या वाढत्या घटना व स्त्रीगर्भाची हत्या करण्याची प्रवृत्ती या दोन्ही गोष्टी अतिशय तिरस्करणीय व दंडनीय आहेत. परंतु या दोन्ही गोष्टींकडे जितक्या गांभीर्याने राज्यकर्त्यांनी पहायला हवे तितक्या गांभीर्याने त्यावर विचार केला जात नाही हेच या समस्योगील मूळ कारण …

पत्रसंवाद

प्रा. प्रवीण घोडेस्वार, नाशिक gpraven 18feb@gmail.com बंजारा समाजातील ढावलो गीते हा सुनंदा पाटील यांचा लेख आजचा सुधारक च्या डिसेंबर २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे. मी गेल्या काही वर्षांपासून आजचा सुधारकचा नियमित वाचक आहे. माझं अत्यंत नम्र आणि प्रामाणिक मत आहे की, आजचा सुधारकमध्ये असं लेखन प्रसिद्ध झालेलं नाही. त्यामुळे अंकात हा लेख बघून थोडासा …

ऊर्जेचे झाड

अंतर्गोल भिंगातही वस्तूंचा आकार लहान दिसतो, आपल्या दृष्टिकोणात मावतो. आपल्याला ऊर्जा हवी असते आणि ती वेगवेगळ्या मार्गांनी उपलब्ध होते. समजा, ऊर्जेचे एक झाड आहे. त्या झाडालाही एकूण 1000 फळे आहेत. सर्वजण ह्या ऊर्जेच्या झाडाकडे फळे गोळा करण्यासाठी जातात. या फळांचे दोन प्रकार आहेत. एक व्यापारी ऊर्जेचा (कोळसा, तेल, वीज), आणि दुसरा अव्यापारी म्हणजे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या …

हतबलतेची जागतिक व्यापकता

सध्या सर्वत्र चीनचा बोलबाला आहे. संशोधने, आर्थिक क्षमता, नागरी व्यवस्था अशा अनेक संदर्भातून पाहता चीन आघाडीवर आहे. अमेरिकेच्या तर नाकी दम चीनने आणलेला आहे. चीनमध्ये बंडखोरी स्वागतार्ह तर मानली जात नाही, उलट बेमालूमपणे कापून काढली जाते. ऑलिंपिकमध्ये चीनला मिळणाऱ्या यशामागे खेळाडूंकडून उत्कृष्ट उतारा पदरात पडावा यासाठी त्यांचा लहानपणापासून अक्षरशः छळ केला जातो. याबद्दलच्या बातम्या आपण …

पत्रसंवाद

विनायक श्रीकृष्ण महाजन, अर्थ, मु.पो.कुडावळे, ता. दापोली, जि.रत्नागिरी-415712 आजचा सुधारकच्या ऑक्टो. 2012 च्या अंकामधील ‘कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आजच हलाखीच्या स्थितीवर उपाय’ हा दिवाकर मोहनी यांचा लेख वाचला. या विषयावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा त्यानी सुरुवातीसच व्यक्त केली आहे. चर्चेमध्ये सहभाग म्हणून काही गोष्टी लिहीत आहे. सर्वसमावेशक विकास असा धोशा लावणाऱ्या अर्थतज्ज्ञ पंतप्रधानांच्या काळात काय घडते आहे …

पत्रसंवाद

वृन्दाश्री दाभोलकर, 57, प्रतापसिंह कॉलनी, बारावकरनगर (संभाजीनगर), सातारा 415004. (मोबा.9881736366) बंधुभाव हा शब्द आपण वापरतो. आसुच्या अलीकडील दोन्ही अंकांत तो अनवधानाने असावा-वापरलेला आढळला. हा शब्दप्रयोग अतिशय आक्षेपाहे आहे हे कुणीही विवेकवंत मान्य करेल. ‘बंधुभाव’ यात भगिनीभाव अध्याहृत/गृहीत धरलेला आहे. पण ही समावेशकता या शब्दात वस्तुतः अजिबात नाही. परंपराझापड असल्यामुळे त्यातील आक्षेपार्हता कुणाच्या सहजी लक्षातही येत …

पत्रसंवाद

प्रमोद सहस्रबुद्धे, बी 4/1101 विकास कॉम्प्लेक्स, कॅसल मिल कम्पाउंड, ठाणे (पश्चिम) 400 607 मेंदू-विज्ञान विशेषांक : एक प्रतिक्रिया मेंदू-विज्ञान विशेषांक (खरे तर मेंदू-विज्ञान-तत्त्वज्ञान विशेषांक म्हणायला हवे.) हा अंक वाचताना एक उत्सुकता होती. मेंदूविज्ञानातील प्रगती अजूनही तत्त्वज्ञानातील प्रश्न सोडवण्या इतपत झालेली नाही असे माझे एक मत होते. त्यामुळे हे दोन विषय संलग्न नाहीत असे मला वाटत …

पत्रसंवाद

संजीव चांदोरकर, 206, मेहता पार्क, भागोजी कीर मार्ग, लेडी जमशेटजी रोड, माहीम (पश्चिम), मुंबई 400016. — गेल्या काही अंकांपासून मासिकाच्या वर्गणीवरून जो काही पत्रव्यवहार अंकात छापला जात आहे त्यातून भावना बाजूला काढल्या तर समाज सुधारणेला वाहून घेतलेले आसूसारखे व्यासपीठ (जे 22 वर्षे सातत्याने चालवणे हीच मोठी गोष्ट आहे) आजच्या जमान्यात कसे सुरू ठेवायचे या बद्दल …

पत्रसंवाद

गंगाधर रघुनाथ जोशी, 7, सहजीवन हौसिंग सोसायटी, ‘ज्ञानराज’ सिव्हिल लाईन्स्, दर्यापूर, जिल्हा अमरावती -444803. आजचा सुधारक चा जून-जुलै 12 चा मेंदू विज्ञानावरचा जोडअंक वैचारिक मेजवानीच ठरावा. सर्व लेख वाचून झाल्यावर अतृप्तीच शिल्लक राहाते; व त्या अतृप्तीचेही समाधान वाटावे अशी त्या अंकाची मांडणी दिसते. अनेक शास्त्रज्ञांचे संदर्भ त्यात आहेत. पण ठोस निर्णयापर्यंत कोणीही येऊ शकले नाही.. …

पत्रसंवाद

बाबूराव चंदावार, साईनगर, दी. 1, फ्लॅट-13, सिंहगड रोड, पुणे 411030. दूरध्वनी – 020-24250693 आमचे चिरंजीव उत्पल चंदावारकडे आजचा सुधारक येतो. अधूनमधून मी पाहत असतो. मार्च2012 चा अंकही पाहिला आहे. यात नक्षलवादी, लोकशाहीच देशाची अखंडता’ हा श्री देवेन्द्र गावंडे यांच्या पुस्तकातला अंश मुखपृष्ठावर दिलेला आहे विरोधातलीच भूमिका आजचा सुधारकची आहे, असेच मला वाटले. श्री देवेन्द्र गावंडे …

संपादकीय

सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण ह्या सूत्राभोवती ह्या विशेषांकातील लेख गुंफलेले आहेत. हा विशेषांक एरवीच्या अंकांपेक्षा काहीसा वेगळा आहे. बालकांना निःशुल्क आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क देणारा अधिनियम एप्रिल 2010 पासून लागू झाला. ह्या अधिनियमाच्या कलम 8 व कलम 29 नुसार भारतातील प्रत्येक मुलाला आता चांगल्या गुणवत्तेच्या शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. मात्र, हा अधिनियम लागू होऊन 18 महिने …

पत्रसंवाद :

श्री. दाभोलकरांच्या पत्रांच्या निमित्ताने श्री दत्तप्रसाद दाभोलकर ह्यांची तीन पत्रे गेल्या दोन अंकांत प्रसिद्ध झाली आहेत. त्याचप्रमाणे गेल्या अंकाबरोबर आपल्या मासिकाची बावीस वर्षे पूर्ण झाली आहेत. 1990 मध्ये नवा सुधारक सुरू झाला तेव्हापासूनच ह्या मासिकात जाहिराती कधीही घ्यायच्या नाहीत आणि हे मासिक एका ‘रिसर्च जर्नल’सारखे चालवावयाचे असे संपादकांच्या मनात होते. इतकेच नव्हे तर विवेकवादाविषयी ज्यांना …

पत्रसंवाद

दत्तप्रसाद दाभोळकर, ‘या’ सदर बझार, सातारा. स्थिरध्वनी (02162)239195), भ्रमणध्वनी : 9822503656 id : dabholkard@dataone.in . सूर्यापोटी शनैश्वर…? पण कोण…? आजीव वर्गणीदारांची व्यथा मांडणाऱ्या माझ्या पत्राची खिल्ली उडवीत मला तर्कट तिरकस भाषेत दिलेले आपले उत्तर (आ.सु.494, फेब्रुवारी 2012) वाचले. आम्ही संपादक आहोत. मासीक आमचे आहे. तुमचे पैसे बुडवून वर आम्ही, तुमचीच आमच्या मासीकात खिल्ली उडव शकतो …

पत्रसंवाद

ललिता लिमये, भ्रमणध्वनी 9272545654 मी, ललिता श्रीकांत लिमये, आपल्या मासिकाची आजीव सभासद आहे. आपल्या जाने. 2012 च्या अंकातील सूचनेप्रमाणे आजीव सभासदत्वाच्या नूतनीकरणाकरिता सोबत रु.3000/- चा चेक पाठवीत आहे. माझ्या आठवणीप्रमाणे फार वर्षांपूर्वी मी 500 रु. भरले होते. परंतु आता आपण उर्वरित रकम देणगी म्हणून स्वीकारावी. परत करू नये. चेक मिळाल्याची पोच द्यावी. ता.क. : मी, …

आजचा सुधारक तर्फे परिसंवाद व वाचकमेळावा

आजचा सुधारक चे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2011 चे अंक मराठीकारण विशेषांक म्हणून काढण्यात आले होते. त्यांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने दि.20 नोव्हेंबर 2011 रोजी नागपूर येथील बाबुराव धनवटे सभागृहात ‘मराठी माणूस : गडचिरोली से सिलिकॉन व्हॅली’ ह्या विषयावर परिसंवाद व त्याला जोडून आ.सु. चा वाचक मेळावा आयोजित करण्यात आला होता. परिसंवादासाठी शिवसेना आमदार अभिजित अडसूळ, मनसेचे सरचिटणीस …

पत्रसंवाद

अरुंधती डांगे, 9, लक्ष्मी-सदा अपार्टमेंट, विकासनगर, वर्धा रोड, नागपूर मोबा.9371458002 आजचा सुधारक या मासिकाचे दोन्ही मराठीकारण विशेषांक वाचले. संपूर्ण लेखकवर्गाने अत्यंत कळकळीने मराठीकारणासंबंधी आपले विचार मुद्देसूद रीतीने मांडले आहेत आणि हे खरोखरीच फार आवश्यक होते. ‘मराठी भाषेला सध्या अत्यंत दुर्गती प्राप्त झाली असून, तिच्या या अवस्थेला बरीच कारणे जबाबदार आहेत’, असे म्हणण्याची किंवा चर्चा करण्याची …

आजचा सुधारक ने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना ह्या राजकीय पक्षांना पाठवलेली प्रश्नावली

1. महाराष्ट्रराज्यनिर्मितीच्या वेळी संपूर्ण मराठी जनतेने पाहिलेले संपन्न, समर्थ व कष्टकऱ्यांच्या राज्याचे स्वप्न साकार का होऊ शकले नाही? 2. महाराष्ट्रराज्यनिर्मितीच्या 51 वर्षांनंतरही त्यात मराठीपण कुठे दिसत नही, उलट मराठी भाषा दीनवाणी झाल्याचेच चित्र दिसते, ह्याला जबाबदार कोण? सरकारने जबाबदारी टाकली असे मानले, तरी सर्व राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे व मराठी माणूस यांनी आपली जबाबदारी पार पाडली …

पत्रसंवाद

आशुतोष दिवाण, कोल्हापूर मी आपला एक नियमित वाचक आहे. आजकाल मला एक अडचण जाणवत आहे ती आपणास कळवतो. माझ्या असे लक्षात आले आहे की बरेचसे लोक (जवळजवळ सगळेच) सामाजिक, राजकीय, वैचारिक चर्चामध्ये वेगवेगळ्या संज्ञा फारच अंदाजे आणि भोंगळ स्वरूपात वापरत असतात. म्हणजे समजा, समतावादी लोक म्हणजे कोण? ते मार्क्सवादी लोकांपासून वेगळे कसे? समाजवादी विचार म्हणजे …

लेखक परिचय

चिं.मो.पंडित : स्थापत्य विशारद, सल्लागार म्हणून निवृत्तीनंतर शेती व त्यासंबंधी प्रश्न सोडवू पाहणाऱ्यांशी संपर्क राखून असतात. आसुचे जुने लेखक पत्ता : 6, सुरुचि, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई 400 057 दूरध्वनी – 26147363 सुहास परांजपे : मुंबई आय.आय.टी.मधून केमिकल इंजिनिअरिंग चे पदवीधर. नोकरी न करता अनेक वर्षे स्वयंसेवी संस्थांत कार्य. SOPPECOM (Society for Peoples …

पाव नाही? केक खा!

पाव नाही? केक खा! आजकाल एक गैरसमज प्रचलित झाला आहे, की विज्ञान-तंत्रज्ञानाचे गतकाळातील यश पाहता पुढेही सर्व प्रश्न नेहेमीच विज्ञान-तंत्रज्ञानाने सुटत राहतील; भलेही पृथ्वीची लोकसंख्या कितीही वाढो. विज्ञानाबाबतच्या अपुऱ्या आकलनातून हा गैरसमज विश्वव्यापी झाला आहे. जसे, सिक्युरिटी अॅण्ड ग्रोथ या पुस्तकाचे लेखक बार्नेट व मोर्स हे थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा नियम थेट उलटा करून ही भूमिका मांडतात. …

संपादकीय खरे वृत्त शोधपत्रकारिता?

गेले काही महिने प्रसारमाध्यमांतून वेगवेगळे घोटाळे गाजत आहेत. यांपैकी 2 जी घोटाळा या नावाने ओळखला जाणारा, तो सगळ्यांत थोर. पावणेदोन लाख कोटी रूपये महसूल या घोटाळ्यामुळे बुडला, असे सांगितले जाते. हे नुकसान किती काळात झाले, हे मात्र कुठेही नोंदले गेलेले नाही. महसूल नेहेमी विशिष्ट काळात कमावला जात असतो. जर असा काळ नोंदला गेला नसेल, तर …

पुस्तक-परिचय: स्वातंत्र्याचा सौदा (भाग 2)

पुस्तक-परिचय: स्वातंत्र्याचा सौदा (भाग 2) [“आम्ही तुम्हाला सुरक्षित, सुखवस्तू आयुष्याची हमी देतो, पण त्या मोबदल्यात तुम्हा प्रजाननांना तुमच्या काही स्वातंत्र्यांचा संकोच होणार, हे मान्य करायलाच हवे.” असे सत्ताधीश सांगतात व प्रजा ते मानते. या अघोषित करारांची तीन रूपे आपण पहिल्या भागात पाहिली. सिंगापूर, चीन व यूएसए या त्या तीन आवृत्त्या होत्या. जॉन कॅफ्नरच्या फ्रीडम फॉर …

पुस्तक-परिचय : विदर्भ राज्य संकल्पना

‘स्वतंत्र विदर्भ राज्य’ हे शब्द पश्चिम महाराष्ट्रात उच्चारले गेले, तर प्रतिसाद कपाळावर आठ्यांचा तरी असतो, किंवा तुच्छतेने हसण्याचा तरी हे प्रतिसाद बहुतेककरून प्रश्नाच्या अपुऱ्या आकलनातून येतात. मुळात विदर्भ राज्य ही संकल्पना कोणत्या आधारावर मांडली जाते, हे स्पष्ट करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी नरेंद्र लांजेवारांना एक मुलाखत दिली. ही मुलाखत विदर्भ राज्य संकल्पना नावाच्या पुस्तिकेतून …

पुस्तक-परिचय : स्वातंत्र्याचा सौदा (भाग 1)

आज अनेक देशांच्या प्रजा सुरक्षित आयुष्यासाठी, सुबत्तेसाठी आपली काही मूलभूत स्वातंत्र्ये सत्ताधीशांना बहाल करताना दिसतात. हे का घडते, हा राजकीय विचारवंतांना बराच काळ छळत आलेला प्रश्न आहे; कारण आजच्या स्थितीच्या जवळपासच्या प्रमाणांच्या आवृत्त्या पूर्वीही भेटत असत. आज सत्ताधीश आणि ते ज्यांच्यावर सत्ता गाजवतात ती प्रजा यांच्यात एक अलिखित, अघोषित करार असल्याचे दिसते. सत्ताधीश म्हणतात, “आम्ही …

पत्रसंवाद

राजीव साने, 2, स्नेह क्लासिक्स्, 7/1 एरंडवणे, पाडळे पॅलेससमोरील रस्ता, पुणे 411004 चौसाळकरांना उमजलेला मार्क्स : काही प्रश्न आजचा सुधारकच्या नोव्हेंबर 2010 च्या अंकात सुधीर बेडेकर यांनी लिहिलेले परीक्षण (मार्क्सवाद-उत्तरमार्क्सवाद ले. प्रा. अशोक चौसाळकर) वाचले. त्यातून बऱ्याच आशा पल्लवित झाल्या. परंतु पुस्तक वाचल्यावर मात्र निराशा झाली. पहिली दोन प्रकरणे खुद्द मार्क्सवर आहेत. या दोन प्रकरणात …

पत्रसंवाद

राजीव जोशी, ‘तत्त्वबोध’, नेरळ माथेरान रोड, कल्याण कर्जत हायवे, नेरळ, जि. रायगड – 01. फोन 02148 238652, 9923103301 (dr..rjeevjoshi@yahoo.com) सप्टेंबर 2010 च्या अंकातील कार्यकारी संपादकांच्या टिप्पणीबाबत : “मूळ प्रश्नांना हात घालण्याची तयारी आणि मानसिकता…. नाही” हे तुम्ही मान्य केले आहेच. आता “मूळ प्रश्न कोणते?” याबाबतचे मत प्रामाणिक आहे? (आणि त्याच्या चर्चेसाठी मन खुले आहे) किंवा …

संपादकीय तुमच्याशिवाय नाही (भाग 3)

समाजाच्या एका भागाला लाभदायक आणि आवश्यक वाटणाऱ्या कृती दुसऱ्या एखाद्या भागाला जाचक ठरतात. दुसऱ्याला त्रास देणे, हा पहिल्या गटाचा हेतू नसतो. पण तो अटळ उपपरिणाम मात्र असू शकतो. असे विषमतेला जन्म देणारे, तीव्र करणारे उपपरिणाम अखेर मुळात कोणाला तरी लाभदायक वाटणाऱ्या हेतूंनाच बहकावून नेतात. हे ओळखून असे घातक उपपरिणाम टाळून मूळ हेतू जास्त व्यापक करणे, …

पत्रसंवाद

संजीवनी चाफेकर, ब-5, सुहृद सोसायटी, मेहेंदळे गॅरेजसमोर, एरंडवणे, पुणे 411004. Sanjeevani@gmail.com ज्या स्त्रियांवर बाळंतपण लादलेले असते (मग त्या विवाहित असोत किंवा बलात्कारित) त्या स्वतःच्याच (जनुकीय) अपत्याच्या सरोगेट मदर (सेल्फ सरोगसी) नव्हेत काय? लादलेले गर्भारपण असले तर, केवळ बीज स्वतःचे आहे म्हणून त्याविषयी आत्मीयता वाटणार नाही. भारतासारख्या देशात अशा गुलामी/दास्याने पीडित असणाऱ्या असंख्य स्त्रिया आहेत. सँडेल …

संपादकीय रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

“कोणत्याही संकल्पनेचे महत्त्व जर तिच्याद्वारे प्रेरित वैचारिक परिवर्तनाने मोजण्याचे ठरविले, तर नैसर्गिक निवडीद्वारा उत्क्रांती ही निर्विवादपणे मानवी इतिहासातील सर्वांत महत्त्वपूर्ण संकल्पना ठरेल.” चार्ल्स डार्विनच्या जन्माला यंदा दोनशे वर्षे पूर्ण झाली. त्याच्या ऑरिजिन ऑफ स्पीशीज ह्या ग्रंथाच्या प्रकाशनालाही दीडशे वर्षे लोटली. पण ह्या ग्रंथामुळे उडालेली खळबळ अजूनही विरली नाही. मानवी बुद्धिमत्तेच्या विविध अंगांना कवेत घेणारा, दैवकशास्त्रापासून …

संपादकीय . . . आणि पर्याय

[गेल्या अंकातील सॉलिप्सिझममधले धोके या लेखाचा हा जोडलेख सं.] शंकाच नको! दैनंदिन जीवनातले सर्व ‘ज्ञान’ आपल्याला केवळ इंद्रियांमार्फत होते. यासोबतच आपण काही बाबी अध्याहृत आहेत, धरून चालण्याजोग्या आहेत असेही मानत असतो. एक म्हणजे आपली इंद्रिये आपल्याला पद्धतशीरपणे फसवत नसतात. कोणाला वाटेल की हे वेगळे सांगायची गरज नाही पण तशी गरज आहे. आपण कधीकधी चुकीचे ऐकतो, …

IPCC – AR – 4

पृथ्वीचे तापमान वाढते आहे आणि त्यामुळे भविष्यात हवामान बदलणार आहे, अशी चर्चा वैज्ञानिकांमध्ये अनेक वर्षे सुरू आहे. या चर्चेत एक महत्त्वाचा प्रश्न असा, की हे मानवी व्यवहारांमुळे घडते आहे की मानवेतर निसर्गातील बदलच यामागे आहेत. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जर वाढणारे तापमान आणि बदलणारे हवामान अनिष्ट परिणाम घडवत असेल, तर त्याबाबतची जबाबदारी ठरवायला …

संपादकीयः श्रद्धा-अंधश्रद्धा-खरी(?) श्रद्धा

श्रद्धा म्हणजे दृढविश्वास. ज्याला अनुकूल पुरावा लागत नाही, प्रतिकूल पुरावा बाधत नाही; तरी तो कायम राहतो. जरासंधासारखा. उदाहरणार्थ, मनुष्य मेल्याने आत्मा मरत नाही. आत्मा अमर आहे असे शास्त्रांनी सांगितले त्या अर्थी ते खरे असलेच पाहिजे. ही श्रद्धा. पुढे सत्ययुग येणार आहे. पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल असे गुरु महाराज म्हणतात, भगवान म्हणतात, पण त्यासाठी त्यांनी सांगितले तसे …

पत्रचर्चा

प्रदीप पाटील, चार्वाक, २६०/१-६, जुना कुपवाड रोड, सांगली, (फोन ९८९०८०४४९८) ऑगस्ट २००७, अंकातील टी.बी.खिलारे यांची प्रतिक्रिया वाचली. जॉन हॉरगन यांच्या लेखाच्या आधारे त्यांनी असे म्हटले आहे की ईश्वरीय-धार्मिक अनुभवांविषयीचे सिद्धान्त चुकीचे व अस्थायी आहेत. मी तो मूळचा लेख “The God Experiment’ वाचला. त्या लेखात जॉन हॉरगन यांनी पाच जणांचे संशोधन दिले आहे. त्यांची चिकित्सा करता …

पत्रचर्चा

डॉ. भा.वि.देशकर, ४१, समर्थनगर, पश्चिम, वर्धारोड, नागपूर-५. श्री. टी.बी. खिलारे यांचे आगस्ट ९६ च्या अंकातील पत्र वाचले. ईश्वराच्या जवळिकीचा दावा त्याच्या मुळापेक्षा फळावरून शोधावा हे विल्यम जेम्स ह्या मानसशास्त्रज्ञाचे म्हणणे अगदी योग्यच आहे. मी सीतारामचंद्रनच्या विधानाकडे एका न्युरोसायंटिस्टच्या दृष्टिकोणातून पाहत आलो आहे. ते हिंदू आहेत, परंपरावादी आहेत व त्यात ते ब्राह्मण आहेत हे मला खिलारे …

परिसंवाद

(चार विचारवंतापुढे पाच प्रश्न मांडले गेले. मांडणी जराजराशी वेगळी असूनही मतांचा गाभा मात्र समान असल्याचे दिसते.) प्रश्न १: भारतीय मध्यमवर्ग कोणत्या अर्थी इतर देशांमधील मध्यमवर्गापेक्षा वेगळा आहे ? आदित्य निगम: आर्थिकदृष्ट्या उपभोक्ता वर्ग सगळीकडे सारखाच असतो. राजकीय-सामाजिक चित्र मात्र (भारतात) गुंतागुंतीचे आहे. दलित, मुस्लिम, हिंदू असे राजकीय आशाआकांक्षांमुळे वेगवेगळे गट पडले आहेत पण ते वेगाने …

वाचकांचे लेखक व्हावे, यासाठी 

‘आजचा सुधारक’ने नेहेमीच असे मानले आहे की वाचकांचे लेखक होऊ शकतात व हा क्रम पुढे सल्लागार, संपादक वगैरेंपर्यंतही जाऊ शकतो. मी (नंदा खरे) असाच वाचक, पत्रलेखक करत कार्यकारी संपादक झालो आहे.  पत्रे, चर्चा, लेख यांचे एकूण प्रमाण 63% सुमारे दोन-तृतीयांश आहे. संपादक व सहकारी 25% भाग व्यापतात. संपादक व सहकाऱ्यांचा भाग कमी होऊन वाचक-लेखकांचा भाग …

पुण्याचा वाचक मेळावा

1 मे 2004 रोजी संध्याकाळी पुण्याला स्नेहसदन येथे आजचा सुधारकच्या वाचकांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी आजचा सुधारकचे सुरुवातीपासूनचे वाचक आणि हितचिंतक ज्येष्ठ साहित्यिक श्री विजय तेंडुलकर होते. महाराष्ट्राच्या विविध भागातून आ.सु.चे वाचक आले होते. शंभरएक वाचकांच्या उपस्थितीत जी चर्चा झाली तिचा अहवाल पुढे देत आहोत. आपल्या प्रास्ताविक भाषणात श्री. रा.प. नेने म्हणाले की …

पत्रव्यवहार

निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, माथेरान रोडजवळ, नेरळ, रायगड – 410101 वादविवाद ज्ञानसंवर्धनासाठी आवश्यक आहेत. आ. सु.मध्ये अनेक विषयांवर वादविवाद झाले. परंतु त्यात खेळाचे नियम मोडणारी पत्रे कमी असत. एप्रिल 2004 च्या अंकातील वसंत त्रिंबक जुमडे यांचे पत्र त्यांपैकी आहे. बहुतेक वादांमध्ये काही मूलभूत गृहीतकांना दोन्ही पक्षांची मान्यता असते. जुमडे यांच्या “… चर्चा व त्यातून दोषारोप …

‘आम्ही नागरिक’

शासनाच्या क्रियांमुळे व निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या हक्कांमध्ये सतत झीज होत असल्याचे आपण सारे अनुभवत आहोत. हे राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत घडत आहे. आता ही झीज थांबवून एकत्रित नागरी क्रियांमधून नागरिकांचे हक्क पुन्हा मागण्याची वेळ आली आहे. या हेतूने ‘आम्ही नागरिक’ (We, The People) या नावाने एक संस्था स्थापण्यात येत आहे . 1) केंद्रीभूत मुद्दे : …

पत्रव्यवहार

डॉ. निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, माथेरान रोडजवळ, नेरळ, रायगड – 410101 (10-03-2004) पृ. 489 वरील परिच्छेद 3 मधील आध्यात्मिकांच्या दाव्यातील एक भाग “…आत्माच… भौतिक गोष्टींचे नियंत्रण करतो….” सिद्ध झालेला नाही. तर्काला किंवा मानवी संवेदनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जाणविणारी वस्तू अशी भौतिक वस्तूची व्याख्या आहे. म्हणूनच, भौतिक उपकरणांना न जाणवणाऱ्या आत्म्याचे अस्तित्व आत्म्याच्या व्याख्येमुळे कधीही मान्य …

माहितीचे दुर्भिक्ष म्हणून विरोधाचा सुकाळ!

31 ऑक्टोबर 2002 ला एका जनहित याचिकेवर निर्णय देताना भारताचे तेव्हाचे सरन्यायाधीश बी.एन. किर्पाल यांनी केंद्र सरकारला नद्या-जोडणी लवकर करण्याचा आदेश दिला. नद्या-जोडणी अत्यंत निकडीची आहे आणि ती लवकरात लवकर करण्याचा आमचा निर्धार आहे, अशा अर्थाची विधाने राष्ट्रपती व पंतप्रधानांनी केली. त्यासाठी (माजी मंत्री व शिवसेनेचे खासदार) सुरेश प्रभूंच्या अध्यक्षतेखाली एक कृतिदल (Task Force) घडवले …

पत्रसंवाद

एस. पी. देशपांडेलेखांचे विषय जरी त्या-त्या विशेषज्ञांनी निवडले असले आणि जगदीशचंद्र बसूंच्या मुखपृष्ठावरील उताऱ्यावरून एकच सर्वसमावेशक विज्ञान असले तरी त्याच्या विविध उपांगांचा ह्या अंकात समावेश करण्याची घेतलेली खबरदारी स्पृहणीय आहे. ज्यांना पानपूरके म्हणतात ती किंवा ज्यांना अवतरणे किंवा चौकटी म्हटले आहे त्या, सुप्रसिद्ध व्यक्ती आणि संशोधकांच्या विज्ञानविषयक निबंधांतून उद्बोधक विचार डोळसपणे निवडून मधून मधून अंकात …

पुस्तक-परिचय

कुंपणापलिकडचा देश – प्रमोद सहस्रबुद्धे भौगोलिक प्रदेशमानाप्रमाणे संस्कृती बदलत राहते.पण हा बदल बहुधा हळू हळू घडत जातो. शेजारच्या किंवा जवळच्या भूभागातील संस्कृतीत साम्यस्थळेच अधिक असतात. विविध कारणांसाठी बऱ्याच जणांना हे सत्य पटत नाही, किंवा ते अशी परिस्थिती बदलवू इच्छितात. बहुतांशी ही कारणे धार्मिक वा राजकीय असतात. असे लोक मग ठिकठिकाणी आपल्या कुवतीनुसार सांस्कृतिक बेटे तयार …

पत्रसंवाद

चिं. मो. पंडित, ६ सुरुचि, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पूर्व) मुंबई — ४०० ०५७ नुकतीच एका तरुण कार्यकर्त्याने अशी खंत व्यक्त केली की सामाजिक कार्य करताना त्याला सततच त्याची विश्वासार्हता सिद्ध करावी लागते. म्हणजे असे की समजा ‘नामांतराचा’ प्र न असेल किंवा ‘आरक्षणाचा’ प्र न असेल तर तो मांडत असलेल्या विचारावर त्याच्या ‘ब्राह्मण्याचा’ अजिबात प्रभाव …

संपादकीय

सप्टेंबर अंकामध्ये डॉ. उषा गडकरी ह्यांचा डॉ. सत्यरंजन साठे ह्यांच्या लेखावर तीव्र टीका करणारा लेख प्रकाशित झाला. त्याला डॉ. साठे ह्यांजकडून उत्तर दिले गेलेच आहे. ते उत्तर व्यक्तिशः दिले गेले आहे. पण ह्या प्रकरणी विवेकवादी नियतकालिकाची भूमिका विशद करण्यासाठी लिहीत आहे. त्याच अंकामध्ये श्री. गंगाधर गलांडे ह्यांचे एक पत्र प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये त्यांनी काही …

तंट्या भिल्लाचे इंग्रजांस पत्र

मे. हुजूर जनाब डिप्टी कमिशनर साहेब, निमाड इलाका,खंडवा. अर्जदार तंट्या वलद भावसिंग भील, रा. पोखर, जि. निमाड सरकार चरणी अर्ज पेश करतो, की सरकार आम्हा गरिबाच्या जिवावर उठले आहे. जंगलातल्या लोकांना हुसकावून लावण्याचा सरकारचा इरादा चांगला नाही. आतापर्यंत कोणत्याही मायबाप सरकारनी डोंगरातल्या आम्हा लोकांना हात लावला नाही, की त्यांची खोड काढली नाही. होळकर सरकार, असीरगड–बु-हाणपूरच्या …

तंट्याच्या पत्राबाबत

‘तंट्या’ या बाबा भांडांच्या कादंबरीत (साकेत, २०००) कधीतरी १८७९ मध्ये तंट्या भिल्लाने निमाडच्या डेप्युटी कमिशनरला लिहिलेले एक पत्र भेटले. गाडगीळ-गुहा यांचे ‘धिस फिशर्ड लँड’ पुस्तक नोंदते की इंग्रजांपूर्वीचे राजे जंगलांकडे बहुतांशी दुर्लक्षच करत असत आणि ही स्थिती इंग्रजांच्या आगमनानंतर बदलली. तंट्याचे पत्र नेमका हाच मुद्दा नोंदते, म्हणून भांडांना पत्र पाठवून पत्राची जास्त माहिती विचारली. त्यांच्या …

पत्रसंवाद

केशवराव जोशी, तत्त्वबोध, हायवे क्र. ३५, नेरळ — ४१० १०१ मध्यंतरी मी नेरळच्या चौकात दहावीच्या प्र नपत्रिकेतील उतारा लावला होता. लगेचच भा.ज.पा.च्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा नेऊन मला दंड- प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४९ प्रमाणे नोटिस द्यावयास लावली. सदरहू नोटिसीत ‘बोर्ड लावून लोकांच्या भावना भडकावून जातीय व धार्मिक तणाव निर्माण झाला’; असे । म्हटले …

संपादकीय असुरक्षित एकाकी भाव—-आणि उतारा

भारताच्या इतिहासात सामान्य जनतेने युद्धांमध्ये किंवा मोठ्या राजकीय चळवळींमध्ये भाग घेण्याची उदाहरणे फारशी नाहीत. कौरवपांडवांचे युद्ध होत असताना म्हणे आसपासचे शेतकरी दिवसाभराची कामे आटपून युद्ध ‘पाहायला’ येऊन उभे राहत. यात ‘धर्मयुद्धा’मुळे बघ्यांना भीती वाटत नसण्याचा भाग असेलही, पण जास्त महत्त्वाचे हे की कोण जिंकणार, या प्र नाचे उत्तर शेतकऱ्यांना नांगरण-डवरण-रोपणी-कापणीपेक्षा महत्त्वाचे वाटत नसे. अठराशे सत्तावनच्या …

पत्रसंवाद

सत्यरंजन साठे, अ-५, श्रीराहुल सहकारी गृहरचना संस्था, ८३/१० एरडवन, पुणे — ४११ ००४ माझा साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला संघाचा फतवा हा लेख आपण पुनर्मुद्रित केलात याबद्दल धन्यवाद. लेखाबद्दल दोन प्रतिक्रिया आपण मला पाठविल्या. त्यावरील माझे भाष्य यासोबत धाडत आहे. श्री. गंगाधर गलांडे यांची प्रतिक्रिया पाहू या. घटनासमितीने पंतप्रधान म्हणून वल्लभभाई पटेल यांची शिफारस केली होती …

पत्रव्यवहार

द. रा. ताम्हनकर, ६७५, गव्हे, दापोली, रत्नागिरी – ४१५ ७१२ जुलै-ऑगस्टच्या आ.सु.च्या अंकांत श्री. वि. वा. ताम्हनकर, मिरज, यांनी—-कीव करण्यालायक अशा लेखकांना, संपादकांना, श्री. ढाकुलकरांना आणि मला स्वतःला—-काही शेलक्या शब्दांनी आमचा नालायकपणा थांबवावा अशी ऑर्डर दिली आहे. मी माझ्यापुरते लिहितो. अहो, वि. वा. ताम्हनकर, मिरज, एवढ्या पत्त्यावर आपणांशी संपर्क साधणे कठीण, म्हणून आपणासाठी आ.सु. मधून …

संपादकीय

समाजात सतत बदल होत असतात. आपल्यापैकी प्रत्येक जण आपापल्यापरीने असे बदल निरखत-नोंदत असतो, त्यांचे बरे वाईट असे मूल्यमापन करत असतो आणि हे सारे इतरांच्या निरीक्षण-मूल्यमापनाशी ताडून पाहत असतो. बहुतेक माणसांना ‘माझेच खरे’ असा गर्व नसतो. आपले विचार मांडणे, इतरांचे विचार समजून घेणे, नव्या भूमिका घडवणे, असे सारे व्यवहार आपण सतत करत असतो. ‘आता मी काय …

लेखकांची ओळख

१. रेणू गावस्कर —- सुमारे पंधरा वर्षे डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूल या रिमांड होममध्ये कुठल्याही पदावर नसताना मुलांबद्दलच्या आत्मीयतेमुळे शिकवायला जात. वंचित मुलांसाठी सतत काम. इंग्रजी साहित्याचा आणि रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याचा अनेक वर्षांचा अभ्यास. २. जॉन होल्ट —- अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ. दुसऱ्या महायुद्धात सैन्यात भरती. नंतर शिक्षक म्हणून काम करताना मुलांच्या दृष्टीतून पाहून शिक्षणपद्धती असफल का …

पत्रसंवाद

गंगाधर गलांडे, 4 Aldridge Court, Meadway, High Wycombe, Bucks, HP11 1SE, United Kingdom आपला मेचा अंक मिळाला. मुखपृष्ठावरचा ‘धैर्य’ या मथळ्याखालचा मजकूर वाचून मनस्वी विषाद वाटला. वर्णन केलेली घटना निंद्य तर खरीच पण संपादकांनी असा मजकूर छापून काय साधले हे मात्र समजत नाही मला. प्रथम मी हे मान्य करतो की १९ एप्रिलचा टाइम्स ऑफ इंडियाचा …

उत्क्रांती: परोपजीवींनी दुस्साहसी बनवलेल्या घुशी

[EVOLUTION : Parasites make Scaredy-rats foolhardy या Science या प्रतिष्ठित नियतकालिकाच्या २८ जुलाय २००० च्या अंकातील कार्ल झिमरच्या लेखाचे हे भाषांतर. झिमरचे ‘Parasite Rex’ (राजा परोपजीवी) हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.ट ‘एक्स–फाईल्स’ हा अधिसामान्य (paranormal) घटनांवर आधारित कार्यक्रम लोकप्रिय व्हायच्या बऱ्याच आधी रॉबर्ट हाईनलाईनने परग्रहांवरून आलेले परोपजीवी माणसांची मने बदलू शकण्याबाबत विज्ञान कथा लिहिली होती. …

पत्रसंवाद

निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, चेकनाक्याजवळ, नेरळ (रायगड) — ४१० १०१ (अ) एप्रिल २००२ च्या अंकात मेहेंदळे यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यातील पुढील विधाने मला खटकली. १. ‘देव ही एक मनोवैज्ञानिक गरज आहे’. २. ‘शाप, कुंडलिनी, रेकी . . . तत्सम शक्तींचा अभ्यास होत आहे.’ ३. ‘डत्दृदत्द्म . . . ध्वनिमुद्रिका . . . विश्वास …

निवेदन

आजचा सुधारक ह्या आपल्या मासिकाने आता बारा वर्षे पूर्ण केली आहेत. त्याचे अंदाजे एक हजार वर्गणीदार आहेत. हिंदी द्वैमासिकाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या वर्गणीदारांची संख्या दीडशेच्या घरात आहे. आजचा सुधारकचे बारा वर्षे अविरत प्रकाशन केल्यामुळे मासिकाच्या आयुष्याचा एक टप्पा गाठला गेला आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. असा टप्पा गाठल्याचे प्रतीक म्हणून आणि आपल्या …

पत्रसंवाद

रवींद्र द. खडपेकर, २० पार्वती, पाटीलवाडी, सिद्धेश्वर तलाव मार्ग, ठाणे — ४०० ६०१ …… अलिकडेच दूरदर्शनवर एक भयानक विज्ञापन पाहण्यात आले. त्यासंबंधी मी ‘राज्य महिला आयोगास’ लिहिले. तुमच्याकडेही हा प्रकार कळवीत आहे. आपण योग्य ती दखल घ्याल ही खात्री आहे. …. मी स्वतः हिंदुत्ववादी गोतावळ्यात असल्याने हिंदुत्वाबाबत माझा विचार नेहमी चालूच असतो. म्हणून मला प्र …

संपादकीय

खेल खेल में दोन ‘गणिती’ कहाण्या सांगतो. गणिताचे एक प्राध्यापक फळ्यावर एका सूत्रापासून दुसरे एक सूत्र सिद्ध करत होते. एका टप्प्यावर ते म्हणाले, “यावरून हे उघड आहे की . . .”, आणि त्यांनाच त्या टप्प्याच्या उघडपणाबद्दल (obviousness) शंका आली. फळा सोडून, टेबलखुर्ची गाठून त्यांनी वीसेक मिनिटे कागदावर काही गणित केले. शेवटी आनंदून उठत ते म्हणाले, …

पत्रसंवाद

केशवराव जोशी, तत्त्वबोध, नेरळ (रायगड) — ४१० १०१ तुम्ही पान ४१५ वर मृतकांची बाबरीनंतरची आकडेवारी मागितली आहे म्हणून हा पत्रप्रपंच करीत आहे. सर्व कमिशननी हिंदूनाच दोषी धरले आहे. सुरवातीलाच एक स्पष्ट करितो की आम्ही बाबरी मशीद पाडण्याच्या विरुद्ध आहोत. आम्ही बाबराची अवलाद नाही. राजवाडे, पोतदार, पगडी, खरे शेजलकरांचे अनुयायी आहोत आणि जे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकवितात …

संपादकीय एका माणसाला किती जमीन लागते?

वीसेक लक्ष वर्षांपूर्वी आजच्या माणसांसारखी माणसे (होमो सेपियन्स) आफ्रिकेत उपजली. फळेमुळे गोळा करून, छोट्यामोठ्या शिकारी करून या माणसांचा उदरनिर्वाह चालत असे. फळझाडे कोठे उगवतात, प्राण्यांची दिनचर्या काय असते, लाकडांना टोकदार करायला दगडांपासून पाती कशी बनवावी, अशा विषयांचे ज्ञान या माणसांना होते. हे सारे त्यांच्या जीवनशैलीसाठी गरजेचे असे तंत्रज्ञान होते. या जीवनशैलीला आज ‘सावड-शिकार’ किंवा ‘संकलन …

कु-हाड आणि साखळी–करवत

उत्पादनाच्या पद्धतींमधले फरक नोंदताना मार्क्स म्हणतो, “पवन-चक्की तुम्हाला सामंतशहा देते, आणि वाफेचे एंजिन भांडवलशहा.” संसाधनांच्या वापरातले तंत्रवैज्ञानिक फरक दाखवताना आपणही असे म्हणू शकतो, “कु-हाड आणि बैलगाडी शेतीची पद्धत देतात, आणि (यंत्रचलित) साखळी-करवत आणि रेल्वे एंजिन औद्योगिक पद्धत देतात.” [धिस फिशर्ड लँड (अॅन इकॉलॉजिकल हिस्टरी ऑफ इंडिया)’ माधव गाडगीळ व रामचंद्र गुहा, ऑक्स्फर्ड इंडिया, १९९२, या …

पत्रसंवाद

भ. पां. पाटणकर, ३-४-२०८, काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७ (क) जानेवारी २००२ अंकातील दोन लेख एकत्र वाचले की एक विनोदी निष्कर्ष निघतो. पुरुष अजून पुरुषप्रधान भूतकाळात राहत असल्यामुळे पा चात्त्य कुटुंबव्यवस्था खिळखिळी होत आहे असे ललिता गंडभीर म्हणतात. आशा ब्रह्म यांच्या मते आपल्या जैविक प्रवृत्ती आणि (उपरी?) नैतिक ध्येये यांच्यातील विरोधामुळे समस्या निर्माण होतात. एक …

पत्रसंवाद

निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, नेरळ, (रायगड) — ४१० १०१ _ श्री. दिवाकर मोहनी यांनी आ.सु. डिसेंबर २००१ मध्ये ‘रोजगार आणि पैसा’ या लेखात देव आणि पैसा यांच्यातील साम्य शोधले आहे. असे करताना विश्वास आणि श्रद्धा यांमध्ये गल्लत झालेली दिसते. एखाद्या गृहीतकावर आधारित अनुमाने खोटी ठरत असल्याचे दिसत असूनही त्या गृहीतकाला कवटाळून बसणे म्हणजे अंधश्रद्धा होय. …

अक्कलखाते

यूनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही संस्था लहान आणि मध्यम गुंतवणूकदारांना देशातील उद्योगांमध्ये ‘थेट’ गुंतवणूक करता यावी यासाठी घडली. सरकारी नियंत्रणाखाली आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या संस्थेत गुंतवलेले पैसे उद्योगांचे समभाग (शेअर्स) घेण्यासाठी वापरुन ही गुंतवणूक होत असते. बँका उद्योगांना कर्जे देतात तर युनिट ट्रस्ट थेट मालकीचा भाग विकत घेते, असा हा प्रकार असतो. सध्या यू.ट्र.ऑ.इं.ची यूएस …

पत्रसंवाद

विजय वर्षा, ‘चार्वाक’, अमृत कॉलनी, भू-विकास बँकेमागे, करंजे, सातारा आस्तिक माणूस अंधश्रद्धाळू असतो, हे विधान खटकणार असले तरी ते सत्य आहे. कारण दैनंदिन जीवनात माणूस वागताना पावलोपावली त्याच्या अंध-श्रद्धाळूपणाचा ‘प्रत्यय’ येतो. घरी देवपूजा करून सुख, शांती समाधान, धन संपत्ती, असे बरच काही देवाकडे मागून कामाला बाहेर पडतो. परंतु रस्तोरस्ती दिसणाऱ्या देखल्या देवाला दंडवत घातल्याशिवाय पुढे …

गर्व से कहो- हम इन्सान हैं!

“तुम्ही स्वतःला दोन गटांमध्ये विभागून घ्या. एकात मुस्लिम, दुसऱ्यात हिंदू, म्हणजे आपापल्या मृतांची तुम्हाला काळजी घेता येईल”, भोपाळचे आयुक्त रणजित सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना म्हणाले. हे विद्यार्थी गॅस दुर्घटनेनंतर मदत करायला आले होते. आयुक्तांच्या सूचनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटली. एका विद्यार्थ्याने विचारले, “अशा वेळी हिंदू आणि मुसलमानांत काही फरक असतो का?” दुसरा म्हणाला, “हे घडू देणारा देव …

शिक्षण — रंगीकरण

बहुतांश भारतीय भारतातल्या औपचारिक शिक्षणव्यवस्थेवर नाराज असतात, हे निर्विवाद आहे. सामान्यपणे आपल्या आसपासची किंवा आपली स्वतःची मुले शिकत असताना आपण आपली नाराजी तपशिलात व्यक्त करतो. एकेका वर्गात प्रचंड संख्येने कोंबलेली मुले, शंकास्पद तज्ज्ञतेचे शिक्षक, खर्च, शिकवणी वर्ग, परीक्षा-गैरप्रकार, आपण सुचतील तेवढे दोष आणि जाणवतील तेवढ्या त्रुटींचा जप करत राहतो. पण साधारण नागरिक त्यांच्या ओळखीतली, नात्यातली …

पत्रसंवाद

सुधाकर देशमुख, कन्सल्टिंग सर्जन, देशमुख हॉस्पिटल, उदगीर, जि. लातूर–४१३५१७ सध्या इंग्रजी वाङ्मयामध्ये J. K. Rowlings ह्यांच्या पुस्तकांचा बोलबाला आहे. त्यांच्या कादंबऱ्यांचा नायक Harry Potter हा पा िचमेत आणि भारतातही (अर्थात इंग्रजीवाचकांत) लोकप्रिय होत आहे. दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकविक्रीच्या याद्यांत ह्या पुस्तकाची आघाडी गेली कित्येक महिने कायम आहे. Times of India सारख्या मान्यवर वृत्तपत्राच्या संपादकीयातही …

पत्रसंवाद

श्री. एस्. पी. तारे, टाईप D, 25/6, ऊर्जा नगर, चंद्रपुर — 442 404 महिलांच्या प्र नांबद्दल आजचा सुधारक फार जागरूक आहे पण त्यांत श्री. शरद जोशी यांच्या लक्ष्मी मुक्ती चळवळीला स्थान मिळायला हवे होते. १ लाखाच्या वर शेतकऱ्यांनी आपल्या स्वीवर इस्टेटीमध्ये पत्नीच्या नावांचा पण संयुक्तपणे समावेश केला आहे. ही फार मोठी सामाजिक क्रांती आहे. त्या …

‘ल्यूटाइन बेल’

लॉइज ऑफ लंडन. काही शतके जगाच्या विमाव्यवसायाचे केंद्र समजली जाणारी संस्था. एका मोठ्या दालनात अनेक विमाव्याव-सायिक बसतात आणि कोणत्याही वस्तूचा, क्रियेचा किंवा घटनेचा विमा उतरवून देतात. लॉइड्जची सुरुवात झाली जहाजे आणि त्यांच्यात वाहिला जाणारा माल यांच्या विम्यापासून. ‘मरीन इन्शुअरन्स’ ही संज्ञा आज कोणत्याही वाहनातून केल्या जाणाऱ्या व्यवहाराच्या विम्यासाठी वापरतात. पूर्वी मात्र जहाजी वाहतूकच महत्त्वाची होती …

पत्रसंवाद

पत्रसंवाद केशवराव जोशी, तत्त्वबोध, हायवे क्र. ३५, नेरळ (रायगड) — ४१० १०१ मला ताठ वागणारी माणसे आवडतात. राजवाडे नातेवाईकांकडे राहत नसत; कारण ते म्हणत, “लोकांकडे राहिले की, त्यांच्या मुलाचे कौतुक करावे लागते. परंतु पात्रता सिद्ध झाल्याशिवाय मला ते जमणारे नाही”. अण्णासाहेब कर्वे मुलाकडे चहा प्यायले, तरी कपात एक आणा टाकून जात. तत्त्वामध्ये थोडीशी जरी तडजोड …

मेंदू, भावना, सहजप्रवृत्ती, नैवेद्य वगैरे

मेंदूची रचना आणि कार्य यांचा अभ्यास दाखवतो की मेंदू आणि संगणक या एकाच नमुन्याच्या रचना आहेत. बाहेरून मिळणाऱ्या संवेदना आणि स्वतःत साठलेले सूचनांचे संच यांच्यावर तार्किक प्रक्रिया करून काही क्रिया घडवणे, हे संगणकाचे काम, आणि मेंदूचेही. बाहेरच्या संवेदना आणि सूचनांचे साठे वापस्न तर्क लढवणाऱ्या यंत्राची कल्पना अॅलन टुरिंग ह्या ब्रिटिश गणितीला १९३५ साली सुचली. १९४३ …

पत्रसंवाद

उषा गडकरी, २५७, शंकरनगर, नागपूर — ४४० ०१० जुलै २००१ च्या अंकात श्री. ग. के. केळकर यांची पुण्याच्या ‘सकाळ’च्या १८ मे २००१ च्या अंकात श्री. यशवंत पाठक यांनी ‘नैवेद्य’ या शीर्षकांतर्गत केलेल्या लिखाणासंबंधातली प्रतिक्रिया वाचली. ती मला मननीय वाटली. विवेकवादानुसार मेंदू, बुद्धी व मन यांचा परस्पर संबंध काय? असा प्र न समोर आल्यास विवेकवादी ‘मन’ …

नागपूर पत्रसंवाद

नाना ढाकुलकर, १७४, तारांगण, विवेकानंद नगर, वर्धा मार्ग, नागपूर–४४० ०१५ सीता जोस्यम्! एक प्रभावी परीक्षण आजचा सुधारकच्या जून २००१ च्या अंकात ‘सीता जोस्यम्’ या नाटकाचा परिचय चास्ता नानिवडेकर ह्यांनी करून दिला आहे. श्रीमती नानिवडेकर यांच्या शेवटच्या अभिप्रायाशी ‘विचारप्रवृत्त करणारे हे नाटक मनाला उच्च प्रतीचा बौद्धिक आनंद देते’ मी पूर्ण सहमत आहे. मी विचारप्रवृत्त तर झालोच …

संपादकीय

उन्हाळा सुरू झाला की नागपूरकर रोजच्या वृत्तपत्रातले तापमानाचे आकडे आदराने वाचतात —- जसे “४५ होते काल!” असाच काही लोकांना वर्षभर ‘पाहावासा’ वाटणारा आकडा म्हणजे सेन्सेक्स हा शेअरबाजारासंबंधीचा निर्देशांक. तापमानात जसे फॅरनहाईट-सेल्सियस प्रकार असतात तसे शेअरांमध्येही सेन्सेक्स-निफ्टी प्रकार असतात, आणि ‘दर्दी’ लोक त्यांच्या तौलनिक विश्वासार्हतेवर वाद घालत असतात. मुळात शेअरबाजार देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दाखवतो का, आणि …

आम्हाला विचारत का नाहीत?

एका गोष्टीचा मात्र जरूर विचार करायला हवा. आपल्या मुलांच्या आयुष्यासंदर्भातल्या ह्या महत्त्वाच्या निर्णयात आपलं स्थान काय? राजकारणी आणि सरकार यांच्या ताब्यात मुलांचे भवितव्य सोपवून नि िचंत रहाणं योग्य ठरेल का? आपल्याला केवळ कल्पनांचे पतंग नको आहेत. आपल्या मुलांसाठी आनंदाचं आणि चांगलं शिक्षण जर खरोखर हवं असेल तर आपल्यासाठी नेमकं काय भलं, काय नाही हे समजावून …

पत्रसंवाद

न. ब. पाटील, अ-३७, कमलपुष्प, वांद्रे रिक्लमेशन, मुंबई — ४०० ०५० सृष्टिज्ञान मासिक ७३ वर्षांचे झाले. मराठी विज्ञान परिषदेनेही पस्तिशी ओलांडली. विज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे हेच ह्या दोघांचेही उद्दिष्ट आहे. मागे वळून पाहण्याच्या उद्देशाने त्या दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे पुण्यात एक छोटासा मेळावा दि. १९ व २० मे २००१ रोजी आयोजित केला होता. या प्रसंगी ‘विज्ञान …

माणसांचे रूपांतर भराभर पाळीव प्राण्यांत होत आहे .

[साहित्य संमेलनातील सरकारी हस्तक्षेपाच्या निषेधार्थ १९८१ मध्ये मुंबईत स्वतंत्र साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना मालतीबाई बेडेकर यांनी मांडलेले विचार आज दोन दशकांनंतरही तितकेच लागू आहेत.] “हे संमेलन पर्यायी आहे की समांतर आहे, या वादात मी गुंतत नाही. जन्माला येणाऱ्या मुलालासुद्धा आपले खरे नाव लाभायला बारा दिवस लागतात. हे संमेलन मोकळेपणाने पहिले …

संपादकीय अस्वस्थता!

अकरा वर्षांपूर्वी आजचा सुधारक सुरू झाले तेव्हा जागतिकीकरण—-खाजगीकरणही सुरू होत होते. त्यावेळी मनमोहनसिंगांनी परकीय मदत मिळवून विकासाचा दर सहा टक्क्यांवरून नऊ टक्क्यांवर नेला. तेव्हा एक प्रवाद असा होता की सहा टक्के विकास दर, ही प्रकाशाच्या वेगासारखी एक अनुल्लंघ्य मर्यादा आहे! तिला हेटाळणीने ‘हिंदू विकास दर’ म्हटले जाई. ही मर्यादा मोडणारे सिंग-राव सरकार अर्थातच कौतुकाचे धनी …

अवैज्ञानिक जनहितविरोध?

फेब्रुवारी २००१ (११.११) च्या अंकात मराठी विज्ञान परिषदेच्या एका स्मरणिकेचा डॉ. र. वि. पंडितांनी परामर्श घेतला आहे. विज्ञान परिषद आणि आजचा सुधारक यांची उद्दिष्टे एकमेकांशी जुळती आहेत, हे डॉ. रविपंचे निरीक्षण योग्यच आहे. ते पुढे नोंदतात की विवेकवाद, स्त्रियांचे समाजातले स्थान, धर्मश्रद्धा वगैरे विषय आ. सु.तल्या अती झालेल्या चर्चेने गुळगुळीत झाले आहेत. त्याऐवजी डॉ. रविपना …

प्रिय वाचक,

गेल्या महिन्यात वॉटर चित्रपट निर्मितीला विरोध करणारी निदर्शने झाली. चित्रिकरण जबरदस्तीने बंद पाडण्यात आले. व्हॅलेंटाइन डे निमित्त प्रेमिकांनी एकमेकांना छुपे संदेश देऊन प्रेम व्यक्त करण्याची पाश्चात्त्यांची पद्धत आहे. आपल्या तरुण- तरुणींनी तिचे नकळत अनुकरण सुरू केले आहे. हळूहळू छापील संदेश-पत्रे, त्यांच्या जाहिराती यांनी भव्य रूप घेतले आणि तो प्रकार डोळ्यात भरण्याइतका मोठा झाला. ज्यांना ह्या …

मागे वळून पाहता

आजचा सुधारकचा हा अंक आठव्या वर्षाचा शेवटचा अंक. या अंकाने आजचा सुधारकने आठ वर्षे पुरी केली आहेत. या आठ वर्षांत त्याने काय काय काम केले याकडे नजर टाकणे पुढील प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे होईल असे वाटते. म्हणून हे सिंहावलोकनआणि वाचकांशी हितगूज. आठ वर्षांपूर्वी जेव्हा एप्रिल १९९० मध्ये आजचा सुधारक चा जन्म झाला तेव्हा त्याच्या अस्तित्वाच्या समर्थनासाठी …

आठवे वर्ष

हा आठव्या वर्षाचा पहिला अंक. तो वाचकांकडे रवाना करताना आम्हाला बरेच समाधान वाटत आहे. सात वर्षांपूर्वी आम्ही ज्या गोष्टी करण्याचे जाहीर केले त्यांपैकी काही थोड्याबहुत प्रमाणात आम्ही साध्य केल्या आहेत अशी आमची समजूत आहे. आजचा सुधारक हे महाराष्ट्रातील एकमेव विवेकवादी मासिक तेव्हा होते आणि आजही ते एकटेच पाय रोवून उभे आहे. कोठल्याही प्रकारच्या तडजोडी न …

पत्रव्यवहार

आजचा सुधारकच्या चौथ्या वर्षाच्या पहिल्या व दुसऱ्या (एप्रिल-मे १९९३) जोड अंकाच्या संपादकीयातील मला महत्त्वाची वाटलेली वाक्ये उद्धृत करून त्यांना अनुलक्षून मी काही सूचना करू इच्छितो. ही वाक्ये अशी- “बालमृत्यू घडवून आणणाऱ्या कारणांना न सुदृढ होत जुमानता आजचा सुधारक ज्या चिवटपणाने उभा आहे त्यावरून हे बाळ असेच जाईल आणि दीर्घायुषी होईल असा विश्वास आम्हाला वाटतो आहे. …

संपादकीय विशेषांकांची योजना

आजचा सुधारक ह्या आमच्या मासिकाच्या गेल्या अंदाजे चार वर्षांच्या वाटचालीत आम्ही तीन परिसंवाद विशेषांकांच्या स्वरूपात प्रकाशित केले. वा. म. जोशी ह्यांचे विवेकवादी लिखाण ह्यावर पहिला विशेषांक, धर्मनिरपेक्षता ह्यावर दुसरा आणि निसर्ग आणि मानव ह्या विषयावर तिसरा. ह्या तीनही विशेषांकांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता थोड्या वेगळ्या प्रकारच्या विशेषांकांची योजना केली आहे. या विशेषांकांचे एक वैशिष्ट्य असे …

चर्चा

त्या अनाठायी औदार्याने काय साधले? श्री संपादक, आजचा सुधारक यांसी स. न. वि. त्या घटनेला आता ४५ वर्षे होऊन गेली आहेत. तिचा विचार आज अलिप्तपणे करता येतो का, हे पहावे अशा उद्देशाने हे लिहीत आहे. सुरुवातीलाच हे अगदी स्पष्टपणे सांगितले पाहिजे की गांधी-हत्येशी या चर्चेचा संबंध जोडायचा नाही ही या चर्चेची पूर्व अट आहे. सर्वानाच …

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक स.न.वि.वि. मुस्लिम प्रश्नासंबंधात श्री वसंत पळशीकरांना ‘वाळूत डोके खुपसून बसणाऱ्या शहामृगाची उपमा देणारे मा. श्री. रिसबूड यांचे पत्र वाचले. (नोव्हें. ९३) “(हिंदूंच्या) सनातन धर्माच्या कोणत्या तत्त्वानुसार मुस्लिम समाजाचे मन वळविण्याचे कोणते प्रयत्न (हिंदूंकडून) झाले.?” असा पळशीकरांचा प्रश्न आहे. या प्रश्नाची मूलगामी चिकित्सा नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई यांनी केलेली आहे. मुस्लिमांचे …

इतर

‘मला कोणी शत्रू नाही ही तुझी बढाई आहे ना ! माझ्या मित्रा ! तुझी ही प्रौढी व्यर्थ आहे.. शूराला साजेशा पद्धतीने जीवनाच्या संघर्षात जे उडी घेतात त्यांना अनेक शत्रू निर्माण होतातच तुला जर कुणी शत्रूच नसेल तर…. त्याचा अर्थ एवढाच की तुझ्या हातून काही घडलेलेच नाही. कोणाही विश्वासघातक्याच्या पेकाटात तू लाथ घातली नाहीस. दुष्टाच्या तावडीतील …

वृत्त आणि विवेक

एन्.टी. रामाराव यांचे लग्न ही मोठीच खबर आहे. राष्ट्रीय आघाडी आणि तेलगू देसम् या राजकीय पक्षांचे अध्यक्ष, आंध्राचे माजी मुख्यमंत्री असे हे बडे प्रस्थ आणि मुख्य म्हणजे त्यांचे (जवळपास ‘अवघे पाऊणशे वयमानं’. असे असताना त्यांनी ३६ वर्षाच्या घटस्फोटिता लक्ष्मी शिवपार्वती या आपल्या चरित्र – लेखिकेशी दुसरे लग्न केले आहे. सदान्कदा भगवे कपडे परिधान करून स्वामी …

पत्रव्यवहार

संपादक,आजचा सुधारक यांस स.न.वि.वि. आपल्या मासिकाच्या ऑगस्ट १९९३ च्या अंकात श्री. शांतिलाल मुथ्था ह्यांचा ‘समाजातील मुलींची घटती संख्या: कारणमीमांसा व उपाययोजना’ ह्या शीर्षकाचा लेख व त्यावरील श्री. दिवाकर मोहनी ह्यांचे भाष्य वाचावयास मिळाले. श्री. मुथ्था ह्यांची चिंता सार्थ आहे व त्यांनी केलेली कारणमीमांसा व सुचविलेली उपाययोजनाही बुद्धीला पटणारी आहे. पण श्री. मोहनींनी ह्या संदर्भात व्यक्त …

सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार वितरण-समारंभाचा वृत्तांत

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दि. १४ जुलै ह्या गोपाळ गणेश आगरकर ह्यांच्या जन्मदिनी, पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर पुरस्कारवितरणाचा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता आयोजित केला होता. पाहता पाहता टिळक स्मारक मंदिरातील सभागृह श्रोत्यांनी गच्च भरले. त्यात आपापल्या क्षेत्रातील ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी होती. डॉ. भा. दि. फडके, श्री वसंत पळशीकर, डॉ. अनिल …

संपादकीय – फाटलेले आभाळ ?

श्री दिवाकर मोहनी यांचे आम्हाला आलेले एक पत्र आम्ही अन्यत्र छापले आहे. त्यांनी त्या पत्राद्वारे एका अत्यंत गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाला भ्रष्टाचाराची जी लागण झाली तिची तीव्रता गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे सतत वाढतच आहे, आणि आज जीवनाचे एकही क्षेत्र असे राहिलेले नाही की जे भ्रष्टाचारामुळे किडलेले नाही. राजकारण आणि व्यापार ही …

पत्रव्यवहार

पत्रव्यवहार संपादक, आजचा सुधारक स.न.वि.वि. तमचा “धर्मनिरपेक्षता” अंक मिळाला. त्यात अनेक व्यासंगी विद्वानांचे लेख आले आहेत. त्यात डावे उजवे आहेत. तरी त्यांच्यांत आगरकर यांचा बुद्धिप्रामाण्यवाद गोमारोमातून भिनलेला दिसत नाही. कारण ते सर्वजण हिंदूंच्या सहिष्णुतेची अपरंपार स्तुती करताना दिसतात. वास्तविकरीत्या जगाच्या इतिहासावरून हे स्पष्ट होते की जेते अत्याचार करतात आणि हिंदु जेते कधीच नव्हते. नवराबायको या …

आजचा सुधारकः वाचक मेळावा

‘आजचा सुधारक एक वर्षाचा झाला तेव्हापासून एखादा वाचक मेळावा घ्यायचे वाटत होते. नागपूरच्या वसंतराव नाईक कला व समाजविज्ञान संस्थेच्या (जुने मॉरिस कॉलेज) राज्यशास्त्रविभागाच्या पुढाकाराने ती कल्पना साकार झाली, “धर्मनिरपेक्षता, विवेकवाद आणि आजचे सुधारक’ या विषयावर एक परिचर्चा उपर्युक्त संस्थेचे राज्यशास्त्रविभागप्रमुख प्रा. कवठाळकर यांनी १४ सप्टेबर १९९१ रोजी घडवून आणली. या चर्चेसाठी शहरातील विविध क्षेत्रांशी संबंधित …